सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

इतिहासाचे मूक साक्षीदार- वीरगळ आणि सतीशिळा

वक्ते- वीरगळ आणि शिलालेख अभ्यासक व लेखक, श्री अनिल दुधाणे

आपल्या महाराष्ट्राला शौर्याचा तेजस्वी आणि जाज्वल्य इतिहास लाभला आहे. असंख्य ज्ञात आणि अज्ञात वीरानी आजवर ह्या भूमीवर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तसेच या वीरांच्या स्त्रियांनी काही प्रसंगी सहगमन केल्याची अनेक उदाहरणे सापडतात. त्यांच्या पश्चात त्यांची स्मृती जतन करण्यासाठी तत्कालीन समाजाने गावागावात मध्यवर्ती ठिकाणी, मंदिर प्रांगणात, वेशीवर आणि समरभूमींवर शिल्पे कोरून ठेवली. महाराष्ट्रातील असंख्य गावात अशी वीरगळ आणि सतीशिळा स्मारके मोठया प्रमाणावर विखुरलेल्या आणि दुर्लक्षित अवस्थेत आज पाहायला मिळतात.
वीरगळ आणि सतीशिळा यांच्या इतिहासापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत अश्या अनेक प्रश्नांची उकल.